मुंबई: मागील दोन दिवस उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे मुंबई दौऱ्यावर होते. यूपीमध्ये गुंतवणूक वाढवण्यासाठी मुंबईत त्यांनी विविध उद्योजकांच्या भेटी घेतल्या. या भेटीनंतर त्यांनी 5 लाख कोटींची गुंतवणूक ही यूपीत नेली आहेत. यूपीत रिलायन्स, अदानी, टाटा, पिरामल यासह इतर उद्योग समूहांनी गुंतवणूक करण्याची तयारी दर्शवली आहे. ग्लोबल इन्वेस्टर्स समिटमध्ये याबाबत करार होण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्रातील उद्योग इतर राज्यात जाण्याचे सत्र थांबण्याचे सध्यातरी दिसत नाही. योगींनी ज्या प्रकारे उद्योग उत्तर प्रदेशात वळवण्यात येत आहेत यावरून हे तरी सिद्ध होत आहे की सध्या महाराष्ट्रात तयार होणारे उद्योग हे बाहेरील राज्यात जात आहेत. योगींच्या या दौऱ्यामुळे नक्कीच राजकीय आरोप प्रत्यारोप होणार हे नक्की.
