मुंबई- लोकप्रिय अभिनेता रितेश देशमुख आणि जिनिलिया डिसूजा यांचा ‘वेड’ चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे. या चित्रपटाने खरंच सगळ्यांना वेड लावलंय. त्यातही चित्रपटातील सत्या आणि श्रावणी यांनी प्रेक्षकांना प्रेमाची नवी व्याख्या शिकवली. सत्या आणि श्रावणीवर तर प्रेक्षक भरभरून प्रेम करत आहेत. अशातच आता चित्रपटप्रेमींसाठी एक आनंदाची बातमी आहे. प्रेक्षकांना ‘वेड’ हा चित्रपट फक्त ९९ रुपयात पाहता येणार आहे. या चित्रपटाने आधीच बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. त्यातच आता पुन्हा एकदा सिनेप्रेमींसाठी चांगली बातमी आहे. त्यांना त्यांच्या आवडीचा सिनेमा फक्त ९९ रुपयात पाहता येणार आहे.

२० जानेवारी २०२३ रोजी सिनेमा लव्हर्स डे साजरा करण्यात एक आहे. त्यामुळे या दिवशी तुम्हाला तुमचा आवडता चित्रपट फक्त ९९ रुपयात पाहता येणार आहे. ही ऑफर फक्त २० तारखेसाठीच आहे. फक्त ‘वेड’चं नाही तर तुम्हाला हिंदी, इंग्रजी, दाक्षिणात्य असा कोणत्याही भाषेतील चित्रपट फक्त ९९ रुपयात पाहता येणार आहे. बूक माय शोवर हे तिकीट तुम्ही बूक करू शकता किंवा मल्टिप्लेक्समध्ये जाऊनही तिकीट घेऊ शकता. मराठी प्रेक्षकांसाठी तब्बल चार चित्रपट चित्रपटगृहात तुमची वाट पाहत आहेत. त्यात ‘वेड’, ‘वाळवी’ ,’व्हिक्टोरिया’ आणि ओंकार भोजने याचा ‘सरला एक कोटी’ हे चित्रपट आहेत. त्यामुळे मराठी प्रेक्षक या संधीचा फायदा घेऊ शकतात.

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!