परळी: भाजपचे आमदार सुरेश धस यांनी सरकारनामाला दिलेल्या मुलाखतीत गंभीर आरोप केले आहेत. त्यांच्या म्हणण्यानुसार, संतोष देशमुख हत्याप्रकरणानंतर त्यांना राजकीयदृष्ट्या टार्गेट करण्यात आले असून, ‘खोक्या’ उर्फ सतीश भोसले प्रकरणात त्यांना फसवण्याचा प्रयत्न झाला. धस यांनी बिश्नोई गँगवर आरोप केला आहे की, त्यांचा खून करण्याचा कट रचला गेला होता.

“माझा खून करण्याचा कट होता” – धस

धस म्हणाले, “बिश्नोई गँगने मला व्हिलन ठरवून खोक्या प्रकरणात अडकवण्याचा प्रयत्न केला. त्यांनी मुंबईत बिश्नोई समाजाच्या लोकांना बोलावून, खोक्याने मला हरणाचे मांस पुरवले असल्याचा खोटा आरोप केला. माझा खून करण्यापर्यंतचा डाव रचला होता.”

 

खोक्यावर टीका

धस यांनी खोक्याला वाळू कॉन्ट्रक्टर म्हणून संबोधत, त्याच्या आर्थिक स्थितीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. *”त्याच्याकडे ४-५ लाखांची मालमत्ताही नाही, पण बेनटेक्सचे दागिने घालून फिरतो. त्याच्या घरात वाघार-बिघारचे मांस सापडले, पण वनविभागाने ते हरवून टाकले,”* अशी टीका त्यांनी केली.

 

मुंडे कुटुंबावर हल्ला

धस यांनी परळीचे मुंडे (पंकजा आणि धनंजय मुंडे) यांना देखील टार्गेट केले. *”त्यांनी खोक्याला वापरून माझ्यावर हरणाच्या मांसाचा खोटा आरोप ठेवला. मी माळकरी माणूस आहे, हरणाच्या मांसापर्यंत कधीच गेलो नाही,” असे स्पष्टीकरण देत त्यांनी आरोप फेटाळले.

 

बिश्नोई गँगला धमकी

धस यांनी लॉरेन्स बिश्नोईवरही तीव्र टीका केली. “जर तुम्ही इतक्या खालच्या पातळीवर जात असाल, तर तुमच्यासोबत दोस्ती कशाला? हे मी मुख्यमंत्र्यांना सांगणार आहे,”असे धमकीचे आवाहन त्यांनी केले.

 

या प्रकरणातून राजकीय तणाव वाढल्याचे दिसत आहे. पोलिस आणि प्रशासन यावर काय कारवाई करते, याकडे सर्वांचे लक्ष आहे.

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!