मुंबई: भारतीय क्रिकेटच्या जगतात एक युगाचा अंत झाल्याची घोषणा झाली आहे. देशाची ‘रन मशीन’ स्टार फलंदाज आणि माजी कसोटी कर्णधार विराट कोहलीने अखेर आंतरराष्ट्रीय कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. कोहलीने भारतीय क्रिकेटला अनेक वर्षे गौरवाने नेतृत्व केले. त्याच्या अविस्मरणीय कसोटी करिअरचा प्रवास आज थांबला.
२३,९३० धावा, ३० शतके आणि खंबीर नेतृत्व
कोहलीने त्याच्या १२३ कसोटी सामन्यांच्या करिअरमध्ये ४६.८५ च्या सरासरीने ९,२३० धावा केल्या. यात ३० शतके आणि ३१ अर्धशतके समाविष्ट आहेत. फलंदाज म्हणून सतत आक्रमक आणि टिकाऊ खेळीचे सामर्थ्य दाखवून भारतीय कसोटी संघाला अनेक विजय मिळवून दिले. त्याच्या करिअरची सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या २५४* असून, त्याने ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, दक्षिण आफ्रिका सारख्या देशांमध्ये परफॉर्म करून ‘सर्वकालीन महान’ पदवी पटकावली.
कर्णधार म्हणून अप्रतिम यश
कोहलीने कसोटीमध्ये भारताचे नेतृत्व ६८ सामन्यांत केले त्यापैकी ४० विजय मिळवले. खोलीच्या कारकिर्दीत भारताने पहिल्यांदाच ऑस्ट्रेलियामध्ये कसोटी मालिका जिंकली, तसेच इंग्लंडसारख्या अवघड मैदानांवर ऐतिहासिक विजयगाथा लिहिली. कोहलीच्या नेतृत्वात भारतीय संघ जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर पोहोचला आणि त्याने ‘टेस्ट संघासाठी आक्रमक दृष्टिकोन’ हा नवा मंत्र संघात रुजवला.
क्रिकेट जगताची प्रतिक्रिया
कोहलीच्या निवृत्तीची बातमी क्रिकेट जगतात वाऱ्यासारखी पसरली आहे. माजी आणि वर्तमान खेळाडू, समीक्षक आणि चाहत्यांनी त्याच्या योगदानाला सलाम केला आहे. कोहलीच्या कसोटी करिअरचा शेवट असला तरी त्याने एकदिवसीय आणि टी20 प्रकारात भारताचे प्रतिनिधित्व सुरू ठेवणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
कसोटी क्रिकेटमधून कोहलीची निवृत्ती भारतीय क्रिकेटसाठी एक मोठी दुःखी करणारी गोष्ट आहे मात्र, त्याने मैदानावर कोरलेले असंख्य कीर्तिमान, त्याचा संघासाठी समर्पण आणि ‘खेळाची गंभीरता’ यांनी त्याला भारतीय क्रिकेटच्या इतिहासात अमर केले आहे. आता पुढील पिढीने त्याच्या मार्गावर चालण्याची अपेक्षा क्रिकेटप्रेमी करत आहेत.