देवराष्ट्रे: यशवंतराव चव्हाण सागरेश्वर अभयारण्याच्या आत व  बाहेर अशा वेगवेगळ्या दोन ठिकाणी हरणांचा मृत्यू झाल्याचे निदर्शनास आले आहे. अभयारण्याच्या कार्यालयापासून एकदम हाकेच्या अंतरावर एक हरीण मृत्युमुखी पडलेले असतानाही अभयारण्य प्रशासनाला याची कसलीही कल्पना नव्हती हे धक्कादायक होते.

सागरेश्वर अभयारण्यात हरणांची संख्या खूप प्रमाणात आहे अभयारण्याची कुंपण हे अभयारण्याच्या प्रवेशद्वारासमोरच असलेल्या तळ्याजवळ तुटलेले आहे. २०० ते ३०० फूट सलग कुंपण तुटलेले असल्याने यातून वन्यप्राणी मोठ्या प्रमाणात अन्नाच्या शोधात बाहेर पडत आहेत आणि याच जागेतून मोकाट कुत्रीही अभयारण्यात प्रवेश करत आहेत त्यामुळे अनेक हरणे या मोकाट कुत्र्यांचे भक्ष बनत आहेत.

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!