मुंबई: छत्रपती संभाजी महाराज यांच्या आयुष्यावर आधारित ‘छावा’चित्रपटानं खऱ्या अर्थानं बॉक्स ऑफिस गाजवलं आहे. ३१ दिवसानंतरही सिनेमागृहात प्रेक्षक गर्दी करताना दिसत आहे. ३१ दिवशी देखील चित्रपटाची कोट्यवधींची कमाई झाल्याचं पाहायला मिळालं. या ३१ दिवसात अनेक नवीन सिनेमे बॉक्स ऑफिसवर दाखल झाले,पण छावा चित्रपटासमोर कोणाचाही टिकाव लागला नाही. एकाही सिनेमाला बॉक्स ऑफिस कमाल दाखवता आली नाहीये.
चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतरही पाचव्या रविवारी छावा सिनेमानं कोट्यवधींची कमाई केली आहे. विकी कौशल आणि रश्मिका मंदाना यांच्या चित्रपटानं पहिल्या आठवड्यात २२५.२८ कोटींचा गल्ला जमवला होता. यानंतर दुसऱ्या आठवड्यात चित्रपटानं १८६.१८ कोटींची कमाई केली . तर तिसऱ्या आठवड्यात चित्रपटानं ८४.९४ कोटींची कमाई केली होती.
चौथ्या आठवड्यात छावा चित्रपटानं ४३.९८ कोटींचा गल्ला जमवला होता. आता ३१ दिवसानंतरही चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षक गर्दी करताना दिसतायत. २९ व्या दिवशी सिनेमानं ७.२५ कोटींची कमाई केली आहे. तर ३० व्या दिवशी सिनेमाच्या तुलनेत वाढ झाल्याचं पाहायला मिळालं होतं. ३० व्या दिवशी सिनेमानं तब्बल ८ कोटींची कमाई केली होती. तर सॅकनिल्कच्या रिपोर्टनुसार छावा सिनेमानं ३१ दिवशीही तब्बल ८ कोटींच्या जवळपास कमाई केली आहे.या सिनेमाची एकूण कमाई ही ६७० कोटींच्या जवळपास झाल्याचं म्हटलं जात आहे. निर्मात्यांनी अद्याप अधिकृत आकडे जाहीर केले नाहीयेत तर ८ कोटींच्या जवळपास कमाई करत छावा सिनेमा पाचव्या रविवारी सर्वात जास्त कमाई करण्याचा रेकॉर्ड मोडला आहे.
Source: Maharshtra Times
