मुंबई: शाळेतील वाढत्या गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व इतर त्रासदायक घटना तसेच विद्यार्थ्यांच्या सुरक्षितेचा प्रश्न पाहता राज्य सरकारने शाळांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे आता राज्यातील जवळपास एक लाख आठ हजार 182 शाळांपैकी त्या शाळांमध्ये सीसीटीव्ही बसवण्यात आले असून उर्वरित शाळांमध्ये लवकरात लवकर सीसीटीव्ही लावणे चे काम पूर्ण केले जाईल अशी माहिती शिक्षण मंत्री दादासाहेब भुसे यांनी दिली.

शाळांमध्ये आज काल विद्यार्थ्यांच्या संरक्षणांवरून खूप सारे प्रश्न उपस्थित होत आहे तसेच विद्यार्थ्यांसह शिक्षकांवर सुद्धा गुन्हेगारी प्रवृत्तीच्या घटना घडत असल्याचे समोर येत आहे व एकूणच या सर्वांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आल्याने राज्य सरकारने प्रत्येक शाळेमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचा निर्णय घेतला होता. शाळांमधील आवारातील वाढती गुन्हेगारी हा शाळांसोबतच सरकार पुढेही खूप मोठा प्रश्न निर्माण झाला असल्याने आता सीसीटीव्ही कॅमेरा द्वारे त्यावरती नियंत्रण मिळवण्याचा निर्णय कितपत यशस्वी ठरतो हे येणाऱ्या काळात समजेलच.

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!