बीड: मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या ९ डिसेंबर २०२४ रोजी झालेल्या अपहरण आणि हत्येच्या प्रकरणात नवीन धक्कादायक माहिती समोर आली आहे. गुन्ह्याच्या वेळी इंडिगो गाडी चालवणाऱ्या शिवराज देशमुख यांनी केलेल्या बयातून पोलिसांच्या विलंबित कारवाईचा आरोप केला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, पोलिसांनी लगेच वाजवी कारवाई केली असती, तर संतोष देशमुख यांचा जीव वाचू शकला असता.

 

शिवराज देशमुखांचा मोठा आरोप

शिवराज देशमुख यांनी सांगितले की, संतोष देशमुख यांचे अपहरण झाल्यानंतर ते ताबडतोब पोलीस स्टेशनला गेले होते. तेथे त्यांनी अधिकाऱ्यांना (राजेश पाटील, प्रशांत महाजन, बनसोडे) घटनेची संपूर्ण माहिती दिली. तरीही पोलिसांनी त्यांना सुमारे ३ ते ३.५ तास थांबवून ठेवले. “पोलिस कर्मचाऱ्यांनी सांगितले की, ‘फिर्याद दमानी लिहावी लागते, कायदा बदलल्यामुळे पुस्तक पाहून कलम लिहावे लागेल’, म्हणून फिर्याद दाखल करण्यास वेळ लागला,” असे शिवराज देशमुख यांनी नमूद केले.

 

अपहरणाची भीषण घटना

या प्रकरणातील आणखी एक धक्कादायक बाब म्हणजे, उमरी टोल नाक्यावर संतोष देशमुख यांच्या गाडीवर हल्ला करण्यात आला होता. सुधीर सांगळे याने गाडीच्या काचेवर दगड मारल्यानंतर गाडी अडवली गेली. त्यावेळी शिवराज देशमुख यांना जयराम चाटे याने कोयत्याने धमकावले आणि मारहाण केली. तर सुदर्शन घुले याने संतोष देशमुख यांना जबरदस्तीने स्कॉर्पिओ गाडीत ढकलले आणि अपहरण केले. स्कॉर्पिओचे वाहनचालक सुदर्शन घुले होता, असेही त्याच्याच बयात नमूद केले आहे.

 

प्रश्न पोलिस कारवाईवर

या सर्व घटनांमुळे पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. शिवराज देशमुख यांच्या म्हणण्यानुसार, पोलिसांनी लगेच योग्य तडफ दाखवली असती, तर संतोष देशमुख यांच्या हत्येस प्रतिबंध घालणे शक्य झाले असते. सध्या या प्रकरणाची चौकशी सुरू असून, आरोपींविरुद्ध कठोर कारवाईची मागणी सतत होत आहे.

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!