मुंबई: खाजगीकरणाला विरोध म्हणून महाराष्ट्रातील 30 विविध संघटनांनी एकत्र येऊन तीन दिवसाचा संप पुकारला आहे. ज्याची सुरुवात आज पासून झालेली आहे म्हणजेच ४, ५ आणि ६ तारखेस असा एकूण ७२ तासांचा महावितरणाचा संप सुरू राहणार आहे.

अदानी समूहाला वीज वितरणाचा परवाना देण्यास विरोध म्हणून हा संप पुकारल्याचे महावितरण कर्मचाऱ्यांकडून सांगण्यात आले आहे. महाराष्ट्रातील एकूण जवळपास एक लाख वीस हजार हून अधिक कर्मचारी या संपात सहभागी होणार आहेत त्यामुळे वीजपुरवठा खंडित झाल्यास तो तात्काळ सुरळीत होण्यास अडचणी निर्माण होऊ शकतो.
पण आता ‘वीज कर्मचारी त्यांच्या संपा विषयीची भूमिका बदलतील याची खात्री आहे अन्यथा पर्यायी व्यवस्था झाली असल्याने विद्युत पुरवठा अखंडित राहील याची खात्री बाळगावी.’ असे ट्विट एम एस ई बी चे संचालक विश्वास पाठक यांनी केले आहे.
सर्व प्रकारच्या जाहिरातींसाठी संपर्क ९०२१८०३००१
