‘वीज कंपन्यांचे खासगीकरण करणार नाही’ असे सांगत तिन्ही वीज कंपन्यांचे खासगीकरण करणार नाही, तसा सरकारचा विचार नाही, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले. संपकरी वीज कर्मचाऱ्यांच्या सर्व संघटनांशी आज फडणवीसांनी मुंबईत चर्चा केली.
या वीज कंपन्यांमध्ये राज्य सरकार गुंतवणूक करणार, असे आश्वासन त्यांनी दिले. अदानी कंपनीला वीज वितरण करण्याची परवानगी देऊ नये, ही कर्मचाऱ्यांची मुख्य मागणी आहे. दरम्यान कर्मचाऱ्यांनी संप मागे घेतला आहे.
