पुणे: पोलिसांनी घाट आणि टेकड्यांवर सर्च लाईट बसवण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला. तसेच शहरातील सर्व टेकड्यांवर सायरन सुद्धा बसवले जाणार आहेत. आपत्कालीन परिस्थितीत हा सायरन महत्वाचा ठरणार आहे.

पुणे शहर संस्कृतीचे शहर होते. यामुळे ‘पुणे तिथे काय उणे’ ही म्हण प्रचलित झाली. परंतु गेल्या काही वर्षांपासून पुणे शहराचा विस्तार मोठ्या प्रमाणावर झाला. पुणे शहरात औद्योगिक कंपन्या आल्या. त्यानंतर त्या कंपन्यांमध्ये काम करण्यासाठी देशभरातून कामगार पुण्यात आले. मग पुणे शहर माहिती अन् तंत्रज्ञानाची नगरी झाली अन् देशभरातून सॉफ्टवेअर अभियंते पुण्यात आले. त्यामुळे हळूहळू पुणे शहराची संस्कृती हरवत चालली आहे की काय? असा प्रश्न निर्माण होऊ लागला आहे. गेल्या पाच ते सात दिवसांत पुण्यात अत्याचाराच्या चार घटना उघड झाल्या आहेत. पुणे शहरातील गुन्हेगारी वाढली आहे. यामुळे पुणे पोलिसांनी आता शहरातील टेकड्यांवर आणि घाटांमध्ये सर्च लाईट बसवण्याचा निर्णय घेतला आहे. या टेकड्यांवर सायरनसुद्धा असणार आहेत.

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!