मुंबई: आयपीएल सुरु होण्यासाठी आता अगदी सहा दिवस उरले आहेत. आयपीएलचा पहिला सामना हा २२ मार्चला रंगणार आहे. पहिला सामना कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध राॅयल चॅलेंजर्स बेंगळुरुमध्ये रंगणार आहे. पहिला सामन्याचा थरार हा इडन गार्डन्स कोलकत्ता येथे पाहायला मिळणार आहे. आयपीएलच्या थरारापूर्वी आता महेंद्रसिंग धोनीने त्या एका चुकीची कबुली दिली आहे.

आयपीएल २०१९ मध्ये, चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स हे संघ आमनेसामने होते. दोन्ही संघांमधील सामना जयपूरमध्ये खेळला जात होता. महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखालील चेन्नई सुपर किंग्जला शेवटच्या षटकात १८ धावांची आवश्यकता होती. तोपर्यंत कॅप्टन कूल पॅव्हेलियनकडे निघाला होता. पण जेव्हा पंचांनी नो-बॉलचा निर्णय बदलला तेव्हा धोनी रागाने मैदानात उतरला. त्यानंतर त्याच्यावर दंडही ठोठावण्यात आला. तसेच, त्या वेळी या वादाची चर्चा जोरदीर रंगलेली पाहायला मिळाली. आता जवळजवळ ६ वर्षांनंतर, माहीने ही घटना त्याची ‘मोठी चूक’ म्हणून स्वीकारली आहे.

‘ती खूप मोठी चूक होती…’

जवळजवळ ६ वर्षांनंतर, एका कार्यक्रमात बोलताना धोनीला ही घटना आठवली. माही म्हणाला, “मी मैदानात गेलो होतो तेव्हा आयपीएल सामन्यात हे घडले. ती खूप मोठी चूक होती. तो म्हणाला की असे अनेक प्रसंग आले आहेत जेव्हा काही गोष्टी तुम्हाला भडकवतात. आपण अशा खेळात आहोत जिथे तुम्ही प्रत्येक सामना जिंकणे अपेक्षित आहे. तुम्हाला बऱ्याच गोष्टी सांभाळाव्या लागतात. मी म्हणतो की जेव्हा तुम्ही थोडे रागावलेले किंवा निराश असता तेव्हा तुमचे तोंड बंद ठेवा.”

Source: Maharrshtra Times

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!