मुंबई : महाराष्ट्र सरकारने राज्यात ई-बाईक टॅक्सी सेवेला मान्यता देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा प्रस्ताव मंजूर करण्यात आला असून, ई-बाईक टॅक्सीमुळे सामान्य प्रवाशांच्या वाहतूक समस्येचे निराकरण होणार आहे.

ई-बाईक टॅक्सी म्हणजे काय?

ही एक इलेक्ट्रिक दुचाकी-आधारित टॅक्सी सेवा आहे, ज्यामध्ये दोन प्रवाशांना बसवून जवळच्या ठिकाणी नेण्याची सोय केली जाणार आहे. यामध्ये पावसापासून संरक्षणासाठी पूर्ण कव्हर, GPS सिस्टम, चालक आणि प्रवाशांसाठी विमा तरतूद यासारख्या सुविधा असतील.

भाडे किती असेल? 

सध्या ऑटो-रिक्षा किंवा टॅक्सीमध्ये एका प्रवाशाला तिप्पट भाडे द्यावे लागते, पण ई-बाईक टॅक्सीमध्ये 15 किमी पर्यंतचा प्रवास फक्त ३० ते ४० रुपयांत होईल. उदाहरणार्थ, जिथे ऑटोमध्ये १०० रुपये भाडे आहे, तेथे ई-बाईक टॅक्सी फक्त ३०-४० रुपयांत सेवा देणार.

 

काय असतील नियम?

– फक्त इलेक्ट्रिक बाईक्सच वापर करता येईल.

– बाईक्सचा रंग पिवळा असणे बंधनकारक.

– प्रत्येक बाईकवर GPS सिस्टम असणार.

– चालकाची पार्श्वभूमी तपासली जाईल.

– महिला सुरक्षेसाठी विशेष नियमावली.

– महिलांसाठी महिला चालक असणार.

– 50 बाईक्स एकत्र चालविणाऱ्या संस्थांना परवानगी दिली जाईल.

 

ई-बाईक टॅक्सीचे फायदे  

✅ तरुणांना रोजगार मिळेल.

✅ हवेतील प्रदूषण कमी होईल.

✅ वाहतूक कोंडीतून सुटका.

✅ पार्किंगसाठी कमी जागा लागेल.

✅ प्रवास सुखकर आणि स्वस्त.

 

कधी सुरू होणार सेवा?

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितले आहे की, १ ते २ महिन्यांत ई-बाईक टॅक्सी सेवा सुरू होईल. भाड्यासंदर्भातील अंतिम नियमावली लवकरच जाहीर केली जाणार आहे.

ही सेवा लोकल ट्रेन, मेट्रो, बस, टॅक्सी आणि ऑटोचा पर्याय बनेल, अशी अपेक्षा आहे. सामान्य माणसाच्या वाहतूकीची समस्या सोडविण्यासाठी ही पायरी महत्त्वाची ठरू शकते.

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!