कुंडल, दि. 20 जून: पार्वती लाड एज्युकेशन सोसायटी, कुंडल यांच्या डॉ. पतंगराव कदम माध्यमिक विद्यालयात कै. सौ. भारतीताई महेंद्र लाड (वहिनी) यांचे स्मरणार्थ ध्रुवी फायनान्सच्या वतीने वह्यावाटपाचा एक सामाजिक उपक्रम यशस्वीपणे पार पडला. नवीन शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभी विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचा आधार देण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला.
ध्रुवी फायनान्सचे प्रमुख मा. सुरज लाड यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या उपक्रमात शालेय विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाला संकल्प युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष मा. रोहन महेंद्र लाड, सुरज लाड, संजय लाड, अमोल पवार (सर), सनी लाड, तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. कांचन बाबर, मुख्याध्यापक संतोष पवार, अनिल लाड, सर्व शिक्षक-शिक्षिका, विद्यार्थी आणि सेवक वर्ग उपस्थित होते.
या उपक्रमामुळे नवीन शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहन मिळाले असून, ध्रुवी फायनान्सच्या सामाजिक बांधिलकीचे सर्वांनी कौतुक केले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी शाळेच्या शिक्षकांनी आणि व्यवस्थापनाने मोलाचे सहकार्य केले.