भिवंडी: औरंगजेबाची कबर पाडता येणार नाही शिवाय त्याच संरक्षण करण्याची जबाबदारी हि राज्य आणि केंद्र सरकारवर आहे असे स्पष्टपणे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले. ते भिवंडी येथे छत्रपती शिवाजी महाराज मंदिराच्या लोकार्पण सोहळ्यात बोलत होते. औरंगजेबाची कबर हि वक्फ बोर्डाची मालमत्ता असल्याचेही त्यांनी नमूद केले. कबरीचे महिमामंडल होणार नाही असेही फडणवीस यांनी सांगितले.

एकीकडे उपमुख्यमंत्री शिंदे व मंत्री नितेश राणे कबर काढण्याची भाषा करत आहेत  आहेत तर दुसरीकडून मुख्यमंत्री फडणवीस कबरीचे संरक्षण करण्याची जबाबदारी राज्य व केंद्र सरकारची आहे असे सांगत आहेत. आता लोकांमध्ये असा संभ्रम निर्माण झाला आहे कि सरकारची नेमकी भूमिका काय आहे? तर आता दुसरीकडे माजी आमदार इम्तियाज जलील यांनी नागपूर दंगली वरून एक्स हँडल वरून एक लेख प्रसिद्ध केला. “सर्वच धर्मीयांमध्ये राजकीय मंडळी असुरक्षितता निर्माण करत आहेत. आर्थिक स्थिती मजबूत असणार्यांना याची झळ पोहोचत नाही. राज्यात शेतकऱ्यांची खराब अवस्था, गुंडाराजचे चित्र आहे. इतिहास उकरत बसल्याने काय साध्य होणार? मी ज्या शहरात लहानाचा मोठा झालो तिथे औरंगजेबाच्या जयंत्या – मयंत्यांचे कधी उत्सव झालेले नाहीत.” असे ते म्हणाले.

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!