पुणे: महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांच्या जमिनीच्या मालकीहक्कासंबंधीच्या समस्यांवर मात करण्यासाठी जिवंत सातबारा’ मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेद्वारे ७/१२ उताऱ्यावरील मृत खातेदारांच्या नावांची नोंद काढून त्याऐवजी वारसांची नावे लावण्याची प्रक्रिया वेगवान केली जाईल. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबविण्यात येणार आहे.

मोहिमेचे उद्देश:

– वारस नोंदणी प्रक्रियेतील अडचणी दूर करणे.

– मृत व्यक्तींच्या नावावर असलेल्या जमिनी वारसांकडे सहज हस्तांतरित करणे.

– शेतीच्या खरेदी-विक्री, कर्जप्रक्रियेत येणाऱ्या अडथळ्यांना तोड देणे.

– कायदेशीर वादटंचा टाळणे.

मोहिमेचा कालावधी व चरण:

– १ ते ५ एप्रिल २०२५: तलाठ्यांद्वारे मृत खातेदारांची यादी तयार करणे व चावडीवर जाहीर करणे.

– ६ ते २० एप्रिल: वारसांनी आवश्यक कागदपत्रांसह अर्ज सादर करणे.

– २१ एप्रिल ते १० मे: ई-फेरफार प्रणालीद्वारे वारसांची नोंदणी.

 

अर्जासाठी आवश्यक कागदपत्रे:

– मृत्यू दाखला, रहिवासी पुरावा.

– वारस प्रमाणपत्र किंवा स्वयंघोषणा प्रतिज्ञापत्र.

– पोलिस पाटील/सरपंच/ग्रामसेवक यांचा दाखला.

– सर्व वारसांची माहिती (नाव, वय, संपर्क).

 

महत्त्वाचे सूचना:

– ही प्रक्रिया पूर्णपणे मोफत आहे. दलाल किंवा अधिकाऱ्यांना पैसे देऊ नयेत.

– प्रशासनाच्या तहसीलदार, जिल्हाधिकारी व विभागीय आयुक्त यांच्या देखरेखीखाली मोहीम पार पाडली जाईल.

या मोहिमेमुळे शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीचे अधिकृत हक्क सहज मिळतील, ज्यामुळे शेतीव्यवसायास गती येण्याची अपेक्षा आहे.

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!