मुंबई: रतन टाटा एक असे नाव आहे ज्याला कोणत्याही परिचयाची गरज नाही. आज संपूर्ण जग त्यांना ओळखते. रतन टाटा हे टाटा समूहाचे संस्थापक जमशेदजी टाटा यांचे दत्तक नातू नवल टाटा यांचे पुत्र आहेत. रतन टाटांचा जन्म 28 डिसेंबर 1937 रोजी मुंबईत झाला. उद्योग आणि व्यापार क्षेत्रातील योगदानासाठी भारत सरकारने त्यांना 2002 साली पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित केले होते. रतन टाटा यांच्या व्यवसायिक उपलब्धी आपल्या सर्वांनाच परिचित आहेत पण वैयक्तिक आयुष्याबद्दल लोकांना फार कमी माहिती असेल की ते अविवाहित का राहिले? अनेकांच्या मनात हा प्रश्न नक्कीच निर्माण होत असेल की इतके मोठे उद्योगपती असून जगभरात प्रसिद्धी मिळवूनही त्यांनी लग्न का केले नाही? रतन टाटा यांचा स्वभाव आणि व्यक्तिमत्वामुळे चर्चेत राहतात पण रतन टाटांचे बालपण कसे होते त्यांची प्रेम कथा लग्नापर्यंत कशी पोहोचली नाही याबाबत सविस्तरपणे आज आपण जाणून घेऊयात.
टाटा समूहाचे चेअरमन अमेरीटीस रतन टाटा त्यांचे वैयक्तिक आयुष्य आणि प्रेमाबद्दल अनेकदा उघडपणे बोलले आहेत. टाटा सन्स चे 85 वर्षीय अध्यक्ष एमेरिटस रतन टाटा एका कंपनीत काम करत असताना एंजेलिसमध्ये प्रेमात पडले होते परंतु 1962 च्या भारत चीन युद्धामुळे त्यांची प्रेम कहानी अधुरी राहिली. टाटा आपल्या नात्याबाबत खूप गंभीर होते आणि त्यांना त्या मुलीशी लग्नही करायचे होते पण नंतर ते भारतात आले आणि काही कारणास्तव त्यांची मैत्रीण तिथेच राहिली पण मुलीच्या घरच्यांनी त्यांना लग्नाची परवानगी दिली नाही रतन टाटा यांना पुस्तके विशेषतः यशोगाथा वाचण्याची खूप आवड आहे. एका मुलाखतीत त्यांनी सांगितले की निवृत्तीनंतर मी पुस्तके वाचण्यावर अधिक भर देत आहे याशिवाय त्यांना कुत्रे पाळण्याचीही खूप आवड असून त्यांनी अनेक वेळा आपल्या पाळीव कुत्र्यांचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. रतन टाटा हे नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय असतात आणि त्यांच्या चाहत्यांशी संवाद साधत असतात.
(सौजन्य: महाराष्ट्र टाईम्स)
